Breking: Disha salian Death प्रकरणात CBIने दिली महत्वाची माहिती

WhatsApp Group

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावर आता सीबीआयकडून महत्वाची देण्यात आली आहे. दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळेलं नाही. या प्रकरणावर सीबीआयकडून कधीच चौकशी करण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण सीबीआयकडून देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने तपास केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण सीबीआयकडून या प्रकरणावर कोणताही तपास झाला नाही असं सांगण्यात आलं आहे. सीबीआयच्या या स्पष्टीकरणामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणावरुन भाजप आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीची? भास्कर जाधवांचा व्हिडिओ व्हायरल