कमी रक्तदाबाची कारणे, लक्षणं आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

WhatsApp Group

low blood pressure: रक्तदाबाची समस्या हल्लीच्या धावपळीच्या काळात अगदीच सामान्य झाली आहे. पण कधी रक्तदाब अचानक वाढेल आणि कधी कमी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे त्या रुग्नाला त्रास भोगावा लागतो. रक्तदाब हि एक सामान्य समस्या असून अनेकांना हा त्रास भोगावा लागतो. रक्तदाबाचे दोन प्रकार असतात एक असतो हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब आणि दुसरा असतो लो ब्लड प्रेशर अर्थात कमी रक्तदाब! काहींना उच्च रक्तदाबाला सामोरे जावे लागते तर काहींना कमी रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागतो. उच्च रक्तदाबाची समस्या मद्यपान, धुम्रपान आणि मीठ जास्त खाल्ल्याने उद्भवते तर कमी रक्तदाबाची समस्या आपल्या आहाराशी निगडीत असते.

आहार संतुलित नसलेल्या व्यक्तींमध्ये कमी रक्तदाबाची समस्या मोठे प्रमाणावर दिसून येते. कमी रक्तदाबामुळे कधी कधी रुग्ण बेशुद्ध होऊन कोसळतो. एक चांगली गोष्ट म्हणजे कमी रक्त दाबाची समस्या हि घरगुती उपचार करून सुद्धा नियंत्रणात आणता येते. आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत की असे कोणते घरगुती उपाय आहेत जे केल्याने आपण कमी रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो.

सामान्यत: कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रूग्णांनी स्वत:जवळ नेहमी कॉफी व चॉकलेट बाळगावे. असं म्हणतात की कॉफी व चॉकलेटमध्ये असलेली कॅफिनची मात्रा कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची स्थिती सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून ज्या लोकांना वारंवार कमी रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी स्वत: सोबत नेहमी कॉफी व चॉकलेट ठेवावे. जेणेकरून कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यास ते खाऊन स्थिती नियंत्रणात आणता येईल. हा सल्ला तुम्ही तुमच्या ओळखीच्या त्या लोकांनाही आवर्जून द्या ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे.

मिठाचं जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. परंतु हेच मीठ आश्चर्यकारकरित्या कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना लाभदायी ठरू शकते. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि एक दोन चिमुटभर मीठ त्यात मिसळून दिवसातून किमान तीन वेळा सेवन करावे. हा उपाय केल्यास कमी रक्तदाबामुळे निर्माण झालेली शारीरिक स्थिती पूर्ववत होण्यास मोठी मदत मिळते. त्यामुळे कधी रक्तदाबाचा अधिक त्रास झाल्यास आवर्जून हा उपाय करून पहा आणि रक्तदाब पूर्ववत करा.

जेवून झाल्यावर ताक आवर्जून प्यावे, ही गोष्ट आयुर्वेदात सांगितली आहे. हि गोष्ट कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लागू होते. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दिवसातून किमान 2 वेळा तरी न विसरता ताक प्यावे. यात असलेले चांगले बॅक्टेरिया रक्ताभिसरण प्रक्रिया संतुलित राखण्यास मोठी मदत करतात. हि प्रक्रिया संतुलित राहिल्याने कमी रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल आणि तुम्ही ताक पीत नसाल तर तुम्ही आवर्जून त्याचे सेवन सुरु करा.

आवळा हा कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींसाठी वरदान ठरतो. 2-3 आवळे घेऊन त्यांचा रस काढावा. त्यानंतर या रसात मध टाकून सकाळ आणि रात्री या मिश्रांचे सेवन करावे. हा उपाय का करावा याबद्दल स्पष्टीकरण देताना असे सांगितले जाते की मधामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आणि आवळ्यात असलेले पोषक तत्व कमी रक्तदाबाची समस्या दूर करण्यास मोठा हातभार लावतात. त्यामुळे कधी कमी रक्तदाबाचा त्रास झाला आणि मध व आवळा दोन्ही पदार्थ तुमच्याकडे उपलब्ध असतील तर आवर्जुन हा उपाय करून पहा.

हा घरगुती उपाय सगळ्यात सोपा आहे आणि कोणीही हा उपाय सहज करू शकतो. 15-20 तुळशीच्या पानांचा रस काढून घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून ते मिश्रण सेवन करा. तुम्ही शक्य असल्यास एका वाडग्यात दही घेऊन त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळून सुद्धा ते मिश्रण सेवन करू शकता. हे दोन्ही घरगुती उपाय कमी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मोठी मदत करतात. यामागे वैज्ञानिक कारण असे आहे की दह्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण असते हे कमी रक्तदाब पूर्ववत करण्यासाठी महत्त्वाचे असते. तर मंडळी, हे साधे सोपे घरगुती उपचार नक्की करून पहा आणि कमी रक्तदाबाला आळा घाला.