मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांना काल (23 फेब्रुवारी 2022) ईडीच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना अटक होताच भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहित कंबोज यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला तर यावेळी मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले. मात्र, ही तलवार नाचवणे मोहित कंबोज यांच्या अंगलट येताना दिसून येतं आहे.
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवाल नाचवली होती. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.