Chhattisgarh Accident: छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यातून एका लग्नातून परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. घरी परतत असताना कार आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने वधू-वरांसह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला.रविवारी पहाटे लग्न आटोपून परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
ही कार रामगडहून अकलताऱ्याकडे जात असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिथे 5 जणांचा मृत्यू झाला.मुलमुला पोलीस ठाण्याच्या पकारिया जंगलात ही घटना घडली. स्थानिक लोकांनी आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर डायल करून अपघाताची माहिती दिली आणि पोलिसांना या प्रकरणाची सर्व माहिती देण्यात आली.
कारचा चक्काचूर झाला
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात नेले, मात्र पाचही जणांचा वाटेतच मृत्यू झाला.अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला, मिळालेल्या माहितीनुसार, मृतक एका लग्नात सहभागी होऊन बालोदा येथे परतत होते. ट्रक चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस अजूनही तपास करत आहेत.
जांजगीर चाम्पा ज़िले में दर्दनाक सड़क हादसे में
दुल्हन सहित 5 की मौत।पामगढ से अकलतरा की ओर जा रही कार को अनियंत्रित ट्रक ने मारी ठोकर।
ट्रक चालक ट्रक छोड़ कर फरार हो गया है।#accident @spjanjgirchampa pic.twitter.com/5EpDLwfCYk
— Anshuman Sharma (@anshuman_sunona) December 10, 2023
शनिवारी लग्न आणि रविवारी मृत्यू
याची माहिती कुटुंबीयांना मिळताच आनंदाचे वातावरण शोकाने घेतले. जिथे कालपर्यंत शहनाईचा आवाज आणि नातेवाईकांची धांदल होती. काही तासातच शांतता पसरली. बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांनी शनिवारी रात्रीच लग्न केले. शुभम रविवारी सकाळी वधूचे दर्शन घेऊन कारने घरी परतत होता. गाडीत मुलाचे कुटुंबीय आणि मुलीचे कुटुंबीय दोघेही उपस्थित होते.