IND vs ENG: कॅप्टन रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास

WhatsApp Group

राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसह तो एका खास यादीत सामील झाला आहे.

रोहितने इंग्लंडविरुद्ध इतिहास रचला

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यात 29 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो 9वा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध 47 वा सामना खेळताना ही कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध 9 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली होती आणि राजकोट कसोटीतही त्याने 50 धावांचा टप्पा पार केला आहे.

इंग्लंडविरुद्ध 2000 धावा करणारे भारतीय खेळाडू

3990 धावा – सचिन तेंडुलकर
3970 धावा – विराट कोहली
2999 धावा – एमएस धोनी
2993 धावा – राहुल द्रविड
2919 धावा – सुनील गावस्कर
2189 धावा – मोहम्मद अझरुद्दीन
2154 धावा – युवराज सिंग
2115 धावा – दिलीप वेंगसरकर
2000+ धावा – रोहित शर्मा

राजकोट कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात काही खास झाली नाही. टीम इंडियाने पहिल्या तीन विकेट केवळ 33 धावांत गमावल्या होत्या. मात्र, यानंतर टीम इंडियाने उपाहारापर्यंत एकही विकेट गमावली नाही. पहिल्या दिवसाच्या उपाहारापर्यंत टीम इंडियाने 3 गडी गमावून 93 धावा केल्या होत्या.