Rohit Sharma: क्रिकेटचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर कर्णधार रोहित शर्मा

WhatsApp Group

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज भारत आणि अफगाणिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. , हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. मैदानाचा आकार लहान असल्यामुळे या मैदानावर चौकार आणि षटकार मारणे सोपे आहे. अशा परिस्थितीत जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर उभा आहे.

कर्णधार रोहित मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्यापासून तो फक्त 3 पावले दूर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. गेलने आतापर्यंत 483 सामन्यांमध्ये (तीन्ही फॉरमॅटसह) 553 षटकार मारले आहेत. या यादीत रोहित 551 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन षटकार मारल्यास तो गेलचा विक्रम मोडू शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  1.  ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 553 षटकार
  2.  रोहित शर्मा (भारत) – 551 षटकार
  3.  शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 476 षटकार
  4. ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) – 398 षटकार
  5. मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – 383 षटकार
  6. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

रोहित शर्मा हा ती-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. रोहितच्या नावावर 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 182 षटकार आहेत. या यादीत किवीचा सलामीवीर मार्टिन गप्टिल 173  षटकारांसह दुसऱ्या स्थानावर तर गेल 125 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमावर आता रोहितची नजर आहे.