भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापासून संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. हाताला दुखापत झाल्याने रोहितला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. स्लिपमध्ये कॅच घेताना रोहितच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यावेळी केएल राहुल संघाचा कर्णधार म्हणून मैदानात आपली भूमिका बजावत आहे.
रोहितची दुखापत गंभीर झाल्यास तिसऱ्या वनडेत खेळणे त्याच्यासाठी कठीण होऊ शकते. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिला वनडे गमावल्यानंतर मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रोहितच्या दुखापतीमुळे टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
Update: India Captain Rohit Sharma suffered a blow to his thumb while fielding in the 2nd ODI. The BCCI Medical Team assessed him. He has now gone for scans. pic.twitter.com/LHysrbDiKw
— BCCI (@BCCI) December 7, 2022
बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेदरम्यान टीम इंडियाचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते की, ऋषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज कुलदीप सेनही दुखापतीचा बळी ठरला आणि आता कर्णधार रोहित शर्माही दुखापतग्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत या मालिकेदरम्यान आतापर्यंत एकूण 3 खेळाडू जखमी झाले आहेत.