
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई दीर्घकाळापासून आजारी असून, ती कॅन्सरशी झुंज देत आहे. आता अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी सावंतने तिच्या चाहत्यांसोबत एक वाईट बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीची आई जया भेडा टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. आईची अवस्था बघून स्वतः राखी सावंतने रडत रडत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती रडत आहे आणि आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत आहे. यासोबतच राखीने तिच्या आईच्या तब्येतीचे अपडेटही दिले आहे.
व्हिडिओमध्ये राखी सावंत रडताना दिसत आहे. ती म्हणते, “मी बिग बॉस मराठीच्या घरातून काल रात्रीच बाहेर पडली आहे आणि आता मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आईची तब्येत ठीक नाही. ती रुग्णालयात आहे. तुम्ही सर्वांनी कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. बिग बॉसच्या घरात असताना मला कोणीही सांगितले नाही तिची तब्येत बरी नाही. मला माहित नव्हते की माझी आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिला आता ब्रेन ट्यूमर झाला आहे.”
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चित्रपट कलाकारही शोक व्यक्त करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, सोफिया हयात, अफसाना खान, राहुल वैद्य, पवित्रा पुनिया यांच्यासह अनेक स्टार्सनी राखीला धीर दिला आणि तिच्या आईच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
चित्रपट आणि टीव्ही शोपासून दूर असलेली राखी सावंत आजकाल फक्त टीव्ही रिअॅलिटी शोमध्येच दिसते.