मुंबई – आर्यन खानला (Aryan khan) ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मोठा फटका बसला आहे. आगाऊ पैसे दिल्यानंतरही BYJU’s या ब्रँडने शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याची घोषणा केली आहे. शाहरुख हा बायजूस या ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या लोकप्रिय अँपचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.
ड्रग्स प्रकरणात (Mumbai cruise rave party case) शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केल्यानंतर किंग खान शाहरुख खानला मोठा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. मुलगा आर्यनच्या अटकेमुळे बायजूस या मोठ्या ब्रॅंडने सध्या तरी शाहरुखसोबतचे नाते संपवले आहे. सध्या आर्यनला आर्थर रोड कारागृहात असून पूर्ण खान कुटुंबीय चिंतेत आहे. आर्यनच्या या चुकीचा फटका त्याचे वडील आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान बसला आहे.
शाहरुख खानने BYJU’s सोबतचा करार 3-4 कोटी रुपयांच्या वार्षिक शुल्कावर निश्चित केला होता. 2017 पासून शाहरुख खान हा BYJU’s कंपनीचा ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. शाहरुख BYJU’s सोबत अनेक मोठ्या कंपन्यांसोबत जोडलेला आहे, त्यामुळे या कंपन्याही शाहरुखसोबत असलेलं नातं तोडणार की कायम ठेवणार हे येत्या काळाच समजणार आहे.
ड्रग्स प्रकरणात मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केल्यानंतर शाहरुख खान त्याच्या येणाऱ्या चित्रपटांचे शुटींग बंद करून परदेशातून भारतामध्ये परतला आहे. कमालीचा व्यस्त असणाऱ्या शाहरुख अनेक मोठी कामेही थांबली आहेत. .
आर्यनच्या अटकेनंतर सोशल मीडियावर शाहरुख खानने स्वतच्या मुलाला नीट शिकवले नाही तो इतरांना काय सल्ले देणार, अशा खोचक टीका होत आहेत. याचा विपरीत परिणाम आपल्या कंपनीवर होईल हे लक्षात घेऊन BYJU’s ने शाहरुख खान सोबतचा करार तोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाहरुख खानला मोठं नुकसान होणार आहे.