IPL 2022: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बटलरचे दमदार शतक

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) १५ व्या हंगामातील ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्समध्ये मुंबईतील वानखे़डे स्टेडियमवर होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने दमदार शतक ठोकले आहे. यात ८ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश आहे. बटलरने यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने ५७ चेंडूत त्याने आपले शतक पूर्ण केले.

यापूर्वी, जोस बटलरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. चालू मोसमातील हे इंग्लिश फलंदाजाचे हे तिसरे शतक ठरले आहे. बटलरचे पहिले शतक मुंबईविरुद्ध होते. या मोसमात बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्या सहाव्या तर राजस्थान रॉयल्स सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सहापैकी तीन सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, राजस्थान रॉयल्सचा संघ सहा सामने खेळला असून चार सामन्यांत विजय मिळवला आहे.

आतापर्यंतच्या आयपीएलच्या सामन्यात या दोन्ही संघांचा एकूण २४ वेळा सामना झाला आहे. यात दिल्ली आणि राजस्थान दोन्ही संघांनी प्रत्येकी १२ वेळा विजय नोंदवला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद.

राजस्थान रॉयल्सचा संघ – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, करुण नायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, प्रशांत कृष्णा आणि युझवेंद्र चहल.