मुंबई – राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेला एसटी (ST) कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला. अनेक कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होताना दिसत आहेत. परिणामी एसटीचे चाक आता पुन्हा जोमाने धावू लागल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बसस्थानकावरील गोंगाट आता वाढला असून एसटी प्रशासनाच्या लाऊडस्पिकरद्वारे सूचना कानी पडत आहेत. एकुणच कोरोना (Corona) संकट, संपकाळामध्ये असलेल्या शांततेला पूर्णविराम मिळाला आहे.
एसटी (ST) बस स्थानकांवर आता पुन्हा एकदा एसटीच्या वेळा आणि प्रवाशांसाठी सूचनांचे भोंग्यातील आवाज सुरू झाले आहेत. मुंबईत परेल डेपोमधून ९० ते ९५ टक्के गाड्या आजपासून सुरु झाल्या आहेत. एसटी कर्मचारी आता कामावर हजर होतं आहेत. यामुळे एसटीच्या गाड्या पुन्हा पूर्ण क्षमतेने धावणार आहेत.
एसटी बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कित्येक दिवसांपासून एसटी बस स्थानकातील गोंगाट पूर्ण बंद होता. तो आता पुन्हा सुरु होण्यास सुरुवात झाली आहे.