पर्यटकांनी भरलेली बस पुलावरून पडली, 21 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

WhatsApp Group

युरोपियन देश इटलीमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात व्हेनिस शहराजवळ घडला. शहरातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. पर्यटकांनी भरलेली बस पुलावरून खाली पडली. बस खाली पडताच तिला आग लागली. ज्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. बसमधून प्रवास करणारे पर्यटक कॅम्पिंग ग्राऊंडकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्काय इटालिया टेलिव्हिजननुसार, बसमध्ये 40 लोक होते. त्यापैकी 21 जणांचा मृत्यू झाला. तर 18 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. व्हेनिस सिटी हॉलने सांगितले की, जखमी लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात संध्याकाळी 7.45 च्या सुमारास झाला. जेव्हा बस पुलापासून सुमारे 15 मीटर वीज तारांवर पडली आणि आग लागली.

मृतांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे

गृह मंत्रालयाचे स्थानिक प्रतिनिधी, व्हेनिस प्रीफेक्ट मिशेल डी बारी यांनी सांगितले की मृतांमध्ये पाच युक्रेनियन आणि एका जर्मन नागरिकाचा समावेश आहे. इटालियन न्यूज एजन्सी एएनएसएने वृत्त दिले की बसमध्ये फ्रान्स आणि क्रोएशियाचे प्रवासी देखील होते. “बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.पीडितांमध्ये दोन मुलांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

इटलीच्या पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्हेनिस दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की अलिकडच्या वर्षांत इटलीमध्ये असे अनेक अपघात झाले आहेत. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 2017 मध्ये, उत्तरेकडील वेरोना शहराजवळ हंगेरियन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. ज्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. तर 2013 मध्ये दक्षिण इटलीमध्ये एका पुलावरून बस पडून 40 जणांचा मृत्यू झाला होता.