नितीन गडकरी लवकरच घेऊन येणार हवेत उडणारी बस!

WhatsApp Group

प्रयागराज : जगभरात उडणाऱ्या कारचे प्रयोग सुरू आहेत. काही देशांनी आता त्याला परवानगीही दिली आहे. पण भारतात मात्र उडती बस येणार आहे. हे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी जाहीर केलं आहे. आपण आतापर्यंत सिनेमात किंवा स्वप्नात पाहिलेल्या उडणाऱ्या गाड्या आपल्या खऱ्या आयुष्यात देखील पाहता येणार आहे. हे तर असं झालं की, प्रियांका चोप्राच्या 2050 हा सिनेमातील दृश्य आताकाही वर्षातच पूर्ण झालेलं पाहायला मिळेल.


उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे असतील. आतापर्यंत यूपीत झालेली विकास कामे ही फक्त ट्रेलर आहे. आपल्याकडे निधीची कमतरता नाही. आता प्रयागराजमध्ये हवेत उडणारी बस चालवली जाईल. ज्याचा डीपीआर तयार केला जात आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. गडकरींच्या हवेत उडणाऱ्या बसच्या या अनोख्या घोषणेनंतर अनेकांनी या घोषणेची थट्टा उडवली आहे.