150 फूट खोल दरीत कोसळली बस; 16 भाविकांचा मृत्यू

0
WhatsApp Group

जम्मू-काश्मीरमध्ये एक भीषण रस्ता अपघात झालाय. प्रवाशांनी भरलेली बस 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जम्मू शहरातून शिव खोरी मंदिराकडे निघालेल्या उत्तर प्रदेश रोडवेजच्या बसमध्ये सुमारे ६० जण प्रवास करत होते.

जम्मू-काश्मीरचे वाहतूक आयुक्त राजेंद्र सिंह तारा यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील कालीधर मंदिराजवळ तुंगी मोर येथे हा अपघात झाला. बस खड्ड्यात पडल्याचे पाहून लोकांनी मोठी गर्दी केली होती. लोकांनी मिळून बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अखनूर तारिक अहमद मोके यांना देण्यात आली. लोकांनी आणि पोलिसांनी मिळून जखमींना चौकी चौरा आणि अखनूर रुग्णालयात दाखल केले. एसडीएम अखनूर लेख राज, एसडीपीओ अखनूर मोहन शर्माही घटनास्थळी पोहोचले.