प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली, 5 जणांचा मृत्यू, 40 जखमी

0
WhatsApp Group

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. कोलकात्याला जाणारी बस पुलावरून पडली. या अपघातात एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-16 वरील बाराबती पुलावर रात्री 9 वाजता हा अपघात झाला. बसमध्ये 50 प्रवासी होते आणि बस पुरीहून कोलकात्याच्या दिशेने जात होती.

या अपघातात चार पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 40 जण जखमी झाले असून त्यापैकी 30 जणांना कटक एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.