
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील इसानगर पोलिस स्टेशन हद्दीतील खमरिया पोलिस चौकीजवळील शारदा नदीच्या पुलावर डझनभर प्रवासी घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे खासगी बसमध्ये बसलेल्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. धौराहारा येथून सुमारे 50 प्रवासी घेऊन खासगी बस सकाळी 7.30 वाजता लखीमपूरकडे येत असताना इसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खमरिया पोलीस चौकीजवळील शारदा नदीच्या पुलावर लखीमपूरहून बहराईचकडे जाणाऱ्या ट्रकला धडकली.
Blast in Jammu: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर बॉम्बस्फोटांनी हादरले, गेल्या आठ तासांत दुसरा स्फोट
बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. बसमध्ये बसलेल्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा