बहराइचमध्ये बस आणि ट्रकची धडक, 6 ठार, 15 जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

WhatsApp Group

Bahraich Road Accident: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. रोडवेज बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत, मात्र चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बहराइचचे डीएम दिनेश चंद्र यांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे. बहराइचचे डीएम दिनेश चंद्र म्हणाले, “लखनौहून येणारी रोडवेज बस आणि बहराइचहून येणारा ट्रक यांच्यात धडक झाली. यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. प्रथमदर्शनी, ट्रक चुकीच्या बाजूने आला आणि बसला धडकला सांगितलं जात आहे.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update