बस दरीत कोसळून घडलेल्या अपघातात 15 ते 20 प्रवासी अडकल्याची प्राथमिक समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड घाटात गणपती टप्पा येथे घडली आहे. ही बस संप्तश्रृंगी गडावरुन खामगावच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शाससीय यंत्रणा घटनास्थळी गर्दी केली होती. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
या बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Several people injured after a bus fell into a ravine in Maharashtra’s Nashik district.
More details are awaited.
(Source: Local police) pic.twitter.com/y6Lntdeq18
— ANI (@ANI) July 12, 2023
नाशिक येथील सप्तश्रृंगी किल्ल्यावर सकाळी 6.45 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. बसमध्ये कंडक्टर आणि ड्रायव्हर असे एकूण 22 जण होते. बस अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य पूर्ण करण्यात आले. घटनेनंतर परिसराचे एसपी तथा पालकमंत्री दादा भुसे हेही घटनास्थळी पोहोचले.