Accident Video: कुलगाममध्ये बस अपघात, अमरनाथला जाणारे किमान 20 यात्रेकरू जखमी

WhatsApp Group

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात एका बसला अपघात होऊन अमरनाथला जाणारे 20 यात्रेकरू जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 40 यात्रेकरूंना घेऊन ही बस बालटाल बेस कॅम्पला जात होती. राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंड येथील नुसू बदेरगुंडजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर वाहन त्याच दिशेने जाणाऱ्या डंपरला धडकले.

अधिकृत माहितीनुसार, या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर त्याच परिसरातील रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचवेळी, इतर दोघांना अनंतनाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.