IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात बुमराह उतरणार मैदानात, पण बाहेर जाणार ‘हा’ खेळाडू?

WhatsApp Group

IND vs AUS 2nd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी (IND vs AUS) टीम इंडियामध्ये जवळपास बदल निश्चित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला आहे. तो प्लेइंग-11 मध्ये खेळणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत प्रदीर्घ कालावधीनंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागणार आहे.क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T20 मध्ये उमेश यादवच्या जागी बुमराहला प्लेइंग-11 मध्ये सामील केले जाईल.

भुवनेश्वर आणि हर्षल पटेल यांना संघातील अन्य दोन वेगवान गोलंदाज म्हणून कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20मध्ये उमेश यादवसह भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनीही खूप धावा दिल्या.मोहालीत झालेल्या T20मध्ये उमेश यादवने दोन षटकात 27 धावा दिल्या. मात्र, त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेत भारतीय संघाला सावरले. याउलट हर्षल पटेलने 4 षटकांत 49 धावा आणि भुवनेश्वर कुमारने 4 षटकांत 52 धावा दिल्या. या दोन्ही वेगवान गोलंदाजांना यश मिळाले नाही.

भारतासाठी ‘करो या मरो’चा सामना – तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 4 विकेटने गमावला होता. टीम इंडियाला 208 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा बचावही करता आला नाही. आता या मालिकेतील पुढील सामना नागपुरात होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’चा असेल. सामना गमावण्यासोबतच टीम इंडिया मालिकाही गमावणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे.
भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा