Jasprit Bumrah : बुमराहने मोडला ३० वर्ष जुना विक्रम, कपिल देव यांना टाकले मागे

WhatsApp Group

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाच्या खेळात एकाकी किल्ला लढवला. ३७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने दणक्यात सुरुवात केली. यानंतर बुमराहने दोन विकेट घेत इंग्लंडला धक्के दिले. यादरम्यान बुमराहने माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नावे असलेला ३० वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज हा बहुमान आता बुमराहच्या नावावर जमा झाला आहे. या मालिकेत बुमराहच्या नावावर आता २३ विकेट जमा झाल्या असून १९८१-८२ च्या मालिकेत कपिल देव यांनी २२ विकेट घेतल्या होत्या. भुवनेश्वर कुमार या यादीत १९ विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चौथ्या दिवसाच्या खेळात अखेरच्या सत्रामध्ये ऑली पोपची विकेट घेत बुमराहने कपिल देव यांचा विक्रम मोडला. याचदरम्यान बुमराहने आणखी एक लक्षवेधी कामगिरी केली आहे. South Africa, England, New Zealand and Australia या देशांविरुद्ध बुमराहने १०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहच्या खात्यात सध्या १०१ बळी विकेट जमा आहेत.

याआधी अनिल कुंबळे (१४१ विकेट), इशांत शर्मा (१३० विकेट), झहीर खान (११९ विकेट), मोहम्मद शमी (११९ विकेट), कपिल देव (११९ विकेट) यांनी हा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान अखेरच्या दिवसात इंग्लंड संघाला आता विजयासाठी फक्त ११९ धावांची गरज आहे. रुट आणि बुमराह ही जोडी मैदानावर असल्यामुळे जसप्रीत बुमराहसह सर्वच भारतीय गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.