
भारत आणि इंग्लंड (ENG vs IND 5th Test) यांच्यातील एजबॅस्टन कसोटी सामन्यामध्ये इंग्लिश गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. ब्रॉड आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे. भारताच्या पहिल्या डावात ब्रॉडने एका षटकात तब्बल 35 धावा दिल्या. यापैकी 29 धावा भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या बॅटमधून आल्या, ज्याने त्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. उर्वरित सहा धावा एक्स्ट्राच्या खात्यात गेल्या. बुमराहने ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
यापूर्वी एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तीन खेळाडूंच्या नावावर होता, ज्यांनी 28-28 धावा दिल्या होत्या. सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसनने 2003 मध्ये विंडीजविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यामध्ये एका षटकात 28 धावा दिल्या होत्या. त्यानंतर अँडरसनने 2013 मध्ये आणि जो रूटने 2020 मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा दिल्या होत्या.
BOOM BOOM BUMRAH IS ON FIRE WITH THE BAT 🔥🔥
3️⃣5️⃣ runs came from that Broad over 👉🏼 The most expensive over in the history of Test cricket 🤯
Tune in to Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN) & Sony Ten 4 (TAM/TEL) – https://t.co/tsfQJW6cGi#ENGvINDLIVEonSonySportsNetwork #ENGvIND pic.twitter.com/Hm1M2O8wM1
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 2, 2022
भारताच्या डावातील 84 व्या षटकात स्टुअर्ट ब्रॉडच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने फाइन लेगवर चौकार मारला. त्यानंतर ब्रॉडचा बाऊन्सर चेंडू यष्टिरक्षक सॅम बिलिंग्जच्या अंगावर गेला आणि एकूण पाच धावा झाल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सात धावा झाल्या कारण बुमराहने थर्ड मॅनवर षटकार मारला आणि त्याला नो बॉलमध्ये एक धाव मिळाली. यानंतर बुमराहने सलग तीन चौकार मारले. त्यानंतर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार ठोकत 34 धावा कुटल्या. शेवटच्या चेंडूवर ब्रॉडला थोडा दिलासा मिळाला कारण बुमराह यॉर्कर चेंडूवर फक्त एक धाव घेतली.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (एका षटकातील)
- 35 धावा जसप्रीत बुमराह विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड बर्मिंगहॅम 2022*
- 28 ब्रायन लारा विरुद्ध आर पीटरसन जोहान्सबर्ग 2003
- 28 जॉर्ज बेली विरुद्ध जेम्स अँडरसन पर्थ 2013
- 28 केशव महाराज विरुद्ध जो रूट पोर्ट एलिझाबेथ 2020