बुलढाणा हादरला! फिरण्यासाठी आलेल्या ३५ वर्षीय महिलेवर ८ नराधमांचा अत्याचार

WhatsApp Group

बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर ८ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर ८ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. गुरूवारी दुपारच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.

 

बुलढाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गुरूवारी दुपारच्या सुमारास एक महिला आपल्या मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आली होती. यावेळी देवीच्या परिसरात ते थांबले असताना अचानक ८ जणाचं टोळकं तिथे आलं. महिलेच्या मित्राला मारहाण करत या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली. इतकंच नाही, तर या ८ नराधमांनी महिलेला दरीत ओढत नेले. तिथे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.

 

अत्याचार केल्यानंतर हे आरोपी फरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले. मोहेगावच्या लोकांनी त्यातील एक संशयित आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे. दरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल तीन तास पोलीस  ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.