BSF Recruitment 2023 : BSF मध्ये अनेक पदांवर भरती, वाचा अर्ज कसा आणि कुठे करायचा तो

WhatsApp Group

सैन्य दलात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे BSF Recruitment 2023. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित माहिती वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे, जी 27 मार्च 2023 पर्यंत चालेल.

रिक्त पदांचा तपशील: सीमा सुरक्षा दल या भरतीद्वारे एकूण 1284 कॉन्स्टेबल पदांची भरती करेल. या पदांमध्ये 1200 पदे पुरुष आणि 64 पदे महिलांसाठी आहेत. यामध्ये व्हिसल कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ट्रेड्समन, कॉन्स्टेबल टेलर, कॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर, कॉन्स्टेबल वॉशर मॅन, कॉन्स्टेबल बार्बर, कॉन्स्टेबल स्वीपर, कॉन्स्टेबल वेटर पुरुष/महिला या पदांचा समावेश आहे.

वयोमर्यादा: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांना सूचना वाचण्यासाठी अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.