शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्देवी मृत्यू

WhatsApp Group

अहमदनगर – जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी (water drowning) गेलेल्या भावंडांचा पाण्यात बुडून (Brother-sister death) मृत्यू झाला आहे. बहिणीसोबत आलेल्या 7 वर्षांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्देवी घटना संगमनेर (sangamner) तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्तीमध्ये घडली आहे. जयश्री बबन शिंदे (२१) आणि आयुष बबन शिंदे (७) अशी मृतांची नावं आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्तीत बबन चांगदेव शिंदे आपल्या कुटुंबासोबत राहतात. मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेले होते.आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यामध्ये पडला.

भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी घेतली. मात्र दोघेही शेततळ्यातील खोल पाण्यात जाऊन बुडाले. सदर घटनेची माहिती नागरिकांना मिळताच दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून काढण्यात आले.