British Woman Raped In Goa : गोव्यात ब्रिटिश महिलेवर अरंबोल बीचवर बलात्कार, आरोपीला अटक

WhatsApp Group

गोव्यातील पणजीमध्ये एका 32 वर्षीय व्यक्तीला ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. अरंबोल बीचजवळील (Arambol Beach) प्रसिद्ध ‘स्वीट लेक’मध्ये महिलेसोबत बलात्काराची घटना घडल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जोएल व्हिन्सेंट डिसूझा असे आरोपीचे नाव आहे. त्याने 2 जून रोजी महिला समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असताना तिच्यावर बलात्कार केला.

त्यांनी सांगितले की, ब्रिटिश वंशाची महिला 2 जून रोजी उत्तर गोव्यातील अरंबोल बीचजवळील ‘स्वीट लेक’वर विश्रांती घेत होती. स्थानिक रहिवासी आरोपी जोएल नावाच्या तरुणाने महिलेला वासनेची शिकार बनवले. या घटनेनंतर महिलेने पतीसह पोलिसांत तक्रार दाखल केली. ते दोघेही गोव्याला भेट देण्यासाठी भारतात आले असल्याचे त्यांनी सांगितले.