ब्रेंडन मॅक्युलमची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती!

WhatsApp Group

अखेर इंग्लंडच्या कसोटी संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे. आज इंग्लंड क्रिकेटने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. ब्रेंडन मॅक्युलम सध्या इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.

ब्रेंडन मॅक्क्युलम या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडला पोहोचणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) अजून 2 सामने बाकी आहेत, 18 मे रोजी संघ शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडला रवाना होणार आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याची शकत्या आहे.

40 वर्षीय ब्रेंडन मॅक्युलम जून महिन्यापासून प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे प्रशिक्षक म्हणून त्यांची पहिली मालिका त्याच्याच देश न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 2 जूनपासून इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.