Breaking News: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा

0
WhatsApp Group

बिहारच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवन येथे त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार आज संध्याकाळी 5 वाजता बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शपथविधीला उपस्थित राहू शकतात.

नितीश कुमार म्हणाले…

राजीनाम्यानंतर नितीश कुमार म्हणाले, “मी आज राजीनामा दिला. इंडिया आघाडीत कमालीची अस्वस्थता होती आणि त्यामुळे लोकांची निराशा झाली. पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.” ते म्हणाले, “लवकरच बिहारमध्ये पूर्वीच्या मित्रपक्षांसोबत नवीन सरकार स्थापन होईल.” राज्यपालांनी नितीश यांचा राजीनामा स्वीकारला आहे.