
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज 7 जुलै रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 जुलै 1981 रोजी रांची, बिहार (आता झारखंड) येथे जन्मलेल्या धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले. पदार्पणाच्या अवघ्या 3 वर्षातच धोनीकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि त्यानंतर संघाने जे काही साध्य केले त्याची इतिहासात नोंद आहे.
धोनीकडे कर्णधारपद मिळताच संघाने टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकली आणि त्यानंतर 2011 मध्ये आपल्याच भूमीवर 28 वर्षांनंतर भारताला 50 षटकांचा विश्वचषक जिंकण्यात यश आले. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली आणि अशा प्रकारे तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा माही जगातील पहिला कर्णधार ठरला. वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले आणि कर्णधारपदाचा किताबही पटकावणारे फार कमी खेळाडू आहेत. अलीकडेच धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचे सहावे विजेतेपद मिळवून दिले. धोनी क्रिकेटमध्ये अशा टप्प्यावर पोहोचला आहे की त्याबद्दल विचार करणे देखील प्रत्येक खेळाडूला शक्य नाही. जाणून घेऊया धोनीच्या कामगिरीबद्दल…
#CelebratingThala today, tomorrow and forever 🫶#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/dXZO5wm9ZP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 7, 2023
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली
- सप्टेंबर 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकावर भारताने विजय मिळवला होता. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून भारताने हे विजेतेपद पटकावले.
- धोनी 2016 पर्यंत T20I फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता. त्याचबरोबर 2008 ते 2014 या कालावधीत त्याने कसोटीचे नेतृत्व केले.
- धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 18 महिने कसोटी क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर होती.
- भारताने 2010 आणि 2016 मध्ये आशिया कप जिंकला होता.
- 2011 मध्ये टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.
- 2013 साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. यासह धोनी आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धाजिंकणारा जगातील एकमेव कर्णधार ठरला.
कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर विक्रम
- धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2009 साली प्रथमच कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 27 कसोटी सामने जिंकले.
- 4000 धावा करणारा तो भारताचा पहिला कसोटी यष्टीरक्षक ठरला.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावांची खेळी, कसोटीत सर्वोच्च डाव खेळणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला.
- कसोटीत एकूण 294 बळी, त्यात 256 झेल आणि 38 स्टंपिंगचा समावेश आहे. यष्टिरक्षक म्हणून धोनी सर्वाधिक बळींच्या बाबतीत भारतीयांमध्ये अव्वल आहे.
वनडे क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर विक्रम
- भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याच्या बाबतीत धोनी (350) सचिन तेंडुलकर (463) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- कर्णधार म्हणून 100 सामने जिंकणारा धोनी तिसरा कर्णधार आहे.
- 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 धावांची खेळी, जी यष्टीरक्षकाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
- सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 4031 धावा केल्या.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा तो पहिला भारतीय आणि जगातील पाचवा आहे.
T20 क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर विक्रम
- T20 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे.
- कर्णधार म्हणून सर्वाधिक 41 सामने जिंकले.
- T20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 72 सामने खेळले.
- यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक 87 बळी घेतले आहेत.
- यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक 54 झेल.
आयपीएल क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर विक्रम
- धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 6 IPL खिताब जिंकले आहेत.
- आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 138 झेल आणि 42 स्टंपिंग केले आहेत.
- कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून त्याने 226 सामने खेळले असून 133 सामने जिंकले आहेत.
- चेन्नई सुपर किंग्जला 6 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीने एकूण 12 आयपीएल फायनल खेळले आहेत.
- धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळणारा खेळाडू आहे. त्याने 250 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे.