
ब्राझीलच्या लोकप्रिय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून दुचाकीवर फरार झाले. 23 वर्षीय नुबिया क्रिस्टिना ब्रागाचे इंस्टाग्रामवर 60 हजार फॉलोअर्स होते. ब्राझीलमधील तिच्या घरी ती मृतावस्थेत आढळली.
न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, “नुबिया क्रिस्टीना हत्येपूर्वी सलूनमध्ये गेली होती आणि परतल्यानंतर काही वेळातच, दोन पुरुष मोटरसायकलवर आले आणि तिच्या घरात घुसले. त्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आणि त्यानंतर अधिकारी तेथे पोहोचले. रात्री 9 वाजता ब्रागा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली.
View this post on Instagram
या संपूर्ण प्रकरणात मुखवटा घातलेल्या मारेकर्यांना पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी आता या हत्येचा पुढील तपास सुरू केला आहे. यासोबतच पोलिसांनी स्थानिक लोकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले