चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होने इतिहास रचला आहे. ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. 31 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सच्या डावात 17.2 षटकात ब्राव्होने ही कामगिरी केली. ब्राव्होने या सामन्यात 4 षटके टाकली, ज्यात त्याने 35 धावांत केवळ 1 बळी घेतला. यासह ब्राव्होने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला आहे.
ड्वेन ब्राव्होच्या नावावर 171 विकेट आहेत
ड्वेन ब्राव्होने 153 आयपीएल सामन्यांमध्ये 8.34 च्या इकॉनॉमीसह 171 विकेट घेतल्या आहेत. तर लसिथ मलिंगाने 2009 ते 2019 पर्यंत 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या. लसिथ मलिंगाने एकदा डावात 5 बळी घेतले आहेत, तर ब्राव्होची सर्वोत्तम कामगिरी 4/22 आहे.
???? ???????????????????????????????????? ???????????????????? ????
1⃣7⃣1⃣ wickets & going strong! ???? ????
Congratulations to @DJBravo47 – the leading wicket-taker in the history of the IPL. ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/uEhq27KiBB#TATAIPL | #LSGvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/VQUm6UskWz
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी:
- 171 ड्वेन ब्राव्हो
- 170 लसिथ मलिंगा
- 166 अमित मिश्रा
- 157 पियुष चावला
- 150 हरभजन सिंग
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook