मला कोकेन दिलं आणि बनवला व्हिडिओ, स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

WhatsApp Group

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटर ब्रँडन टेलरने सोमवारी एक ट्वीट केले आहे ज्यात त्याने अनेक गंभीर खुलासे केले आहेत. ब्रँडन टेलरच्या म्हणण्यानुसार, स्पॉट-फिक्सिंगसाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता आणि तो एका भारतीय व्यावसायिकाने केला होता. नंतर टेलरलाही कोकेन देण्यात आले आणि त्याचा व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. या खुलाशानंतर ब्रँडन टेलरवर आयसीसीने बंदी घातली आहे.

स्पॉट-फिक्सिंगबद्दल ब्रँडन टेलरचा खुलासा

ब्रँडन टेलरच्या म्हणण्यानुसार, त्याला झिम्बाब्वेमध्ये टी-20 लीग सुरू करण्याची योजना सांगण्यात आली आणि भारतात येण्यासाठी 15 हजार डॉलर्स देण्यात आले. हे ऐकून मी काळजीत पडलो, पण त्याला झिम्बाब्वे बोर्डाकडून 6 महिने पैसे मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत मी या प्रवासाला निघालो, जिथे मी व्यापारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत डिनरला उपस्थित राहिलो.

कोकेन दिले आणि नंतर बनवला व्हिडिओ

झिम्बाब्वेच्या खेळाडूने पुढे सांगितले की, तेथे ड्रिंक्स सुरू असताना मला कोकेन ऑफर करण्यात आले. ते लोक कोकेन सेवन करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच व्यक्ती माझ्या खोलीत आला आणि मला कोकेन सेवन करतानाचा व्हिडिओ दाखवला आणि धमकी दिली की मी त्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय सामना स्पॉट फिक्स करेन, अन्यथा व्हिडिओ प्रसिद्ध केला जाईल.

ब्रँडन टेलरने पुढे कबूल केले की हॉटेलच्या खोलीत त्याला 6 लोकांनी घेरले होते, त्यानंतर त्याला 15 हजार डॉलर्स देण्यात आले आणि स्पॉट फिक्सिंगसाठी सांगितले आणि काम झाल्यावर आणखी 20 हजार डॉलर्स दिले जातील असे आश्वासन दिले. मला माझा जीव वाचवायचा होता, म्हणून मी घरी परत यावे म्हणून मी ते पैसे घेतले.

ब्रँडन टेलरने पुढे खुलासा केला की जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याची तब्येत बिघडू लागली, तो तणावाखाली होता आणि सतत औषधे घेत होता.