
श्रद्धा हत्याकांडामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. अशातचं आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) प्रेमी युगलांसंबंधीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने स्वत: ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रेमी युगलांवर शासकीय रुग्णालय घाटीमध्ये उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियकराने स्वत:ला पेटवून प्रेयसीला मिठी मारल्यामुळे या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. गजानन मुंडे आणि पूजा साळवे असं या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. दोघे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागातील संशोधक विद्यार्थी आहेत.