प्रियकराने विवाहित प्रेयसीला OYO वर भेटायला बोलावले आणि…

0
WhatsApp Group

गाझियाबाद मोदीनगरमधील कादराबाद भागात असलेल्या ओयो हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडले आहेत. हॉटेलची खोली आतून बंद होती. मुलीचा मृतदेह बेडवर पडला होता तर तिचा प्रियकर फासावर लटकत होता. माहिती मिळताच पोलिसांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला. हापूर येथे राहणार्‍या 21 वर्षीय मधूचे दोन महिन्यांपूर्वीच मोदीनगर येथील रहिवासी मोहितसोबत लग्न झाले होते.

मुलगी औषध आणण्याच्या बहाण्याने प्रियकराला भेटायला आली होती

मिळालेल्या माहितीनुसार, मधुचा प्रियकर हिमांशू रा. खारखोडा याने तिला मोदीनगर कादराबाद येथील ओयो हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. पतीला औषध घ्यायला जात असल्याचे बोलून मधु बाहेर आली. दुपारी पतीने मधुच्या मोबाईलवर कॉल केला असता हिमांशूने कॉल उचलला आणि सांगितले की, त्याने मधूला हॉटेलमध्ये मारले आहे. याबाबत पतीने पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही

मुलीच्या गळ्यात ओढणी बांधण्यात आली होती, तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. यानंतर हिमांशूने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. सध्या दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस सर्व बाजूंचा तपास करत आहेत.