गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून टाकला बहिष्कार!

WhatsApp Group

लातूर – निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावतून एक लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या latur ताडमुगळी गावात एका मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने गावातील देवळात नारळ फोडल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला होता.

एवढच नाही तर ताडमुगळी या गावातील पूर्ण मागासवर्गीय समाजावरच बहिष्कार टाकण्यात आला होता. तर बहिष्कार मोडणाऱ्यालाही दंड ठोठावण्यात येणार, असा फतवाही जाहीर करण्यात आला होता.

गेले काही दिवस हा बहिष्कार चालू होता, मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या गावात जात हा बहिष्कार मागे घेतला.

पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात अशी लाजिरवाणी घटना घडल्याने सगळ्याच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा 

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम

जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक