पुण्यात क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू

WhatsApp Group

पुणे येथील हडपसर परिसरामध्ये क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा फक्त 14 वर्षांचा होता. वेदांत धामणगावकर असं या लहान मुलाचं नाव आहे.

उन्हाळ्याची सुट्टी पडली त्यामुळे तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो मैदानवरच पडला. त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत करण्यात आलं.