Viral Video: रेल्वेमध्ये चक्क किन्नराकडूनच तरुणाने मागितले पैसे; गर्लफ्रेंडला चॉकलेट देण्यासाठी केलेल्या ‘जुगाडा’चा व्हिडिओ व्हायरल
रेल्वेने प्रवास करताना अनेकदा आपल्याला किन्नर (Transgender) पाहायला मिळतात. डब्यात शिरून ते प्रवाशांकडून हक्काने पैसे मागतात आणि लोकही श्रद्धेने किंवा भीतीने त्यांना पैसे देतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने ‘पैसे मागण्या’ची ही वर्षानुवर्षांची परंपराच मोडीत काढली आहे. एका तरुणाने दाखवलेल्या अफाट आत्मविश्वासामुळे स्वतः किन्नरही थक्क झाले आणि त्याला पैसे देऊनच पुढे गेले.
गर्लफ्रेंडसाठी केला भन्नाट ‘जुगाड’
इन्स्टाग्रामवर oosharmajii नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वेचा प्रवास सुरू असल्याचे दिसते. एक किन्नर प्रवाशांकडे पैसे मागत एका तरुणाच्या सीटजवळ येते. आतापर्यंत आपण प्रवाशांना पैसे देताना किंवा बहाणे करताना पाहिले आहे, पण या महाभागाने चक्क त्या किन्नराकडेच हात पसरले. तो मुलगा त्या किन्नराकडे आपली गर्लफ्रेंड बाजूला बसल्याचे सांगून तिच्यासाठी चॉकलेट घ्यायला २० रुपये मागतो.
View this post on Instagram
किन्नराकडून मिळाले २० रुपये
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो तरुण ज्या लाडीकपणे आणि आत्मविश्वासाने पैसे मागतो, ते पाहून त्या किन्नराच्या चेहऱ्यावरही हसू येते. ती व्यक्ती मोठ्या मनाने आपल्याकडची २० रुपयांची नोट काढते आणि त्या तरुणाला देते. हा ‘उलटा प्रकार’ पाहून डब्यातील इतर प्रवासी आणि आता इंटरनेटवर नेटकरीही चक्रावून गेले आहेत.
१० लाख लाईक्स अन् नेटकऱ्यांच्या कमेंट्स
या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी या तरुणाच्या धाडसाचे आणि जुगाडाचे कौतुक केले आहे. एका युजरने गमतीने लिहिले, “हा जगातील पहिला माणूस असेल ज्याने किन्नराकडून पैसे वसूल केले आहेत.” दुसऱ्याने लिहिले, “हा तर ‘फायनल बॉस’ निघाला, याने तर पूर्ण गेमच फिरवला (Uno Reverse).” तर एकाने म्हटले, “पैसे तू मागत आहेस आणि लाज मला वाटतेय!”
