LIVE मॅचमध्ये स्टार बॉक्सरचा मृत्यू, वेदनादायक व्हिडीओ पाहून सगळ्यांचे हृदय हेलावले

WhatsApp Group

तुर्कीचा 38 वर्षीय स्टार बॉक्सर मुसा यामाक याचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुखद निधन झाले आहे. शनिवारी न्यूयॉर्कच्या हमजा वंडेरा विरोधात त्याचा सामना सुरू होता. या मॅचच्या तिसऱ्या फेरीत अचानक त्याची शुद्ध हरपली होती.

तुर्कीचे अधिकारी हसन तुरान यांनी त्यांच्या निधनाचे ट्विट करताना म्हटले की, आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाकला गमावले. तो अलुक्राचा एक बॉक्सर होता.

मुसाने कमी वयातच यूरोपियन व आशियाई चॅम्पियनशिप आपल्या नावे केली होती. मुसा यामाक व हमजा वांडेराचा सामना लाईव्ह सुरू होता. या सामन्याची तिसरी फेरी सुरू होण्यापूर्वी यामाक रिंगमध्ये कोसळला. दुसऱ्या फेरीत त्याला वांडेराकडून एक जबरदस्त ठोसा मिळाला होता. यामुळे काहीवेळ तो अनस्टेबल झाला होता. या घटनेनंतर त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला मृत घोषित केले.

नॉकआऊटमध्ये 8-0 चा आहे विक्रम

मुसा आजपर्यंत नॉकआउटचा एकही सामना हरला नव्हता. 8-0 असा त्याचा विक्रम आहे. मुसा 2017 मध्ये व्यावसायिक मुष्टियोद्धा बनला. पण, त्यांना खरी ओळख 2021 मध्ये जागतिक विजेता झाल्यानंतर मिळाली.