या जगात अशक्य काहीच नाही; तरुणाला लावले मृत व्यक्तीचे दोन्ही हात

WhatsApp Group

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एसएसकेएम हॉस्पिटलने अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली आहे. मृत व्यक्तीचे दोन्ही हात सत्तावीस वर्षीय तरुणाला जोडण्यात आले आहेत, म्हणजेच तरुणाचे दोन्ही हात बदलण्यात आले आहेत. याला कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट म्हणतात. राज्यात किंवा पूर्व भारतात हे प्रथमच घडले आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पाच वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली. रविवारी पहाटे 3 वाजता संपली. ही शस्त्रक्रिया सलग 22 तास चालली. या राज्यातील रुग्णालयाने 32 डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय पथक तयार करून अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली.

सध्या तरुणाला सीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची शारीरिक प्रकृती आता स्थिर आहे. सध्या त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी विभागांतर्गत उपचार सुरू आहेत.