नाशिक – राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे जीवाची पार लाही लाही होत आहे. अशातच नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पोहणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने डोळ्यादेखत या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी अशी पाण्यातून बुडून मृत झालेल्याा तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण देवळाई परिसरामध्ये राहणारे होते. काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी आपल्या चार मित्रांसह नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. धबधब्यावर फिरल्यानंतर चारही मित्र पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरले. मात्र,काही वेळानंतर अचानक धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी दोघे पाण्यामध्ये बुडायला लागले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. मात्र, दोघांचाही बुडून मृत्यू झाला.