वृद्धीमान साहाला धमकी दिल्याप्रकरणी क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदारवर २ वर्षांची बंदी

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला Wriddhiman Saha धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रीडा पत्रकारावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बीसीसीआयने बोरिया मजुमदारवरBCCI bans Boria Majumdar दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षे तो कोणत्याही देशांतर्गत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा भाग असणार नाही. बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) विनंती करेल की या क्रीडा पत्रकाराला आयसीसीच्या कार्यक्रमांमध्ये स्टेडियममध्ये प्रवेश मिळू नये.


रिद्धिमान साहाला धमकावल्याबद्दल बीसीसीआयने पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. रिद्धिमान साहा या बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील खेळाडूने ट्वीट करत या हे सगळे प्रकरण जगासमोर आणले होते. साहाने क्रीडा पत्रकाराच्या गैरवर्तनाबद्दल ट्वीट करताच. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग यांच्यासह सर्व खेळाडूंनी त्याच्या समर्थनार्थ ट्विट करत बीसीसीआयकडे त्या क्रीडा पत्रकारावर बंदी घालण्याची मागणी केली होती.