मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून गुरुवारी शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा यांचाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Bombay High Court grants bail to Aryan Khan in cruise drugs case
— Press Trust of India (@PTI_News) October 28, 2021
आर्यन हा अरबाज मर्चंटसोबत आर्थर रोड जेलमध्ये बंद होता. तर मुनमुन धमेचा भायखळा महिला कारागृहात आहे. आर्यन खानला ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. मागील अनेक दिवसांपासून शाहरुख खान आर्यनच्या जामीनासाठी खटपट करत होता, मात्र आज त्याला आपल्या मुलाला जेलबाहेर काढण्यात यश आले आहे.
२ ऑक्टोबर रोजी मुंबईकडून गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया या जहाजावर एनसीबीच्या पथकाने धाड टाकून कथित ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. यात आर्यनसह एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे.