मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? रुग्णालयात दाखल

WhatsApp Group

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याच्या अफवेने डी कंपनीत खळबळ उडाली आहे. परिस्थिती गंभीर झाल्यावर त्याला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याबाबत अद्याप डी कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही युजर्सने दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे, तर काहींचे म्हणणे आहे की, त्याला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर कडेकोट बंदोबस्तात कराचीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डी कंपनीच्या एका माजी सदस्याने दाऊद इब्राहिमला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केल्याची पुष्टी केली आहे. मात्र, रुग्णालयात का दाखल करण्यात आले होते, हे सांगण्यात आलेले नाही. दाऊद इब्राहिम भारतात अनेक हल्ले आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.

दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. यानंतर भारताने त्याला फरारी घोषित केले. डी कंपनी टोळीचा प्रमुख दाऊदला पाकिस्तानने आपल्या देशात आश्रय दिल्याचे सांगण्यात येत आहे. दाऊदच्या पाकिस्तानातील अस्तित्वाबाबत भारताने अनेकवेळा पुरावे दिले आहेत, मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानने याचा इन्कार केला आहे.