Delhi School Bomb Threat: दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक प्रसिद्ध शाळांना बॉम्बची धमकी

0
WhatsApp Group

Delhi School Bomb Threat: बॉम्बच्या धमकीमुळे दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक शाळांमध्ये घबराट पसरली आहे. दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी आज म्हणजेच बुधवारी सकाळी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा मेल मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक शाळांमध्ये पोहोचले आहे. सर्व शाळा रिकामी करण्यात आल्या असून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शोध मोहिमेत श्वानपथकही तैनात करण्यात आले आहे. बॉम्बची धमकी मिळाल्याने मुलांचे पालकही चांगलेच धास्तावले आहेत. सर्वप्रथम दिल्लीतील द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर एकामागून एक दहाहून अधिक शाळांमध्ये बॉम्बच्या धमकीची माहिती येऊ लागली.

नोएडाच्या डीपीएसमध्ये बॉम्बची धमकी देणारा मेलही आला आहे. शाळांना बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाल्यावर डीआयजी, ऍड. सीपी (एल अँड ओ), शिवहरी मीना म्हणाले, “बॉम्बच्या धमकीची माहिती डीपीएस नोएडा येथे ईमेलद्वारे मिळाली होती. नोएडा पोलिस, अग्निशमन दल आणि बॉम्ब निकामी पथकाच्या पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांना घरी परत पाठवले जात आहे. तपास सुरू असून अद्याप शाळेमधून काहीही मिळालेले नाही.