KK passes away: बॉलिवूडला मोठा धक्का, गायक केके यांचे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये निधन

WhatsApp Group

गायन विश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक केके उर्फ ​​कृष्ण कुमार कुननाथ यांचे निधन झाले आहे. तो कोलकात्यात एका कॉन्सर्टसाठी गेले होते. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मात्र सध्या डॉक्टरांनी काहीही बोलण्याचे टाळळे आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. केके हे बॉलीवूडमधील टॉप-क्लास गायक होते त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि ज्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य केले होते. केकेने रोमँटिक ते पार्टी गाण्यांपर्यंत सर्व काही गायले आहे. मात्र आता त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.