
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. केके यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतं आहेत.
रुग्णालयामध्ये दाखल करण्यापुर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नसून अनेकजण सध्या त्याच्या याच शेवटच्या कॉनसर्टमधील व्हिडीओ शेअर करत आहेत. ‘हम रहें या न रहें कल…’ हे गाणं ‘केके’चं शेवटचं गाणं ठरलं kk last song.
#WATCH | Singer KK died hours after a concert in Kolkata on May 31st. The auditorium shares visuals of the event held some hours ago. KK was known for songs like ‘Pal’ and ‘Yaaron’. He was brought dead to the CMRI, the hospital told.
Video source: Najrul Manch FB page pic.twitter.com/YiG64Cs9nP
— ANI (@ANI) May 31, 2022
केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. केकेच्या मृत्यूनंतर गुरुदास कॉलेजमधील त्याच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.