मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. खोपोली एक्स्प्रेस वेवर अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. तीन गाड्यांची टक्कर झाली, त्यातील एक मलायका अरोराची होती. त्यावेळी कारमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा उपस्थित होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका अरोराला किरकोळ दुखापत झाली आहे. तिला अपोलो रुग्णालयात नेण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एफआयआर नोंदवणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यातं आलं आहे.
मलायका अरोराच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितले आहे की, मलायका अरोराला टाके पडले आहेत आणि आता ती बरी आहे. मात्र, या अपघातामुळे मलायका अरोराला चांगलाच धक्का बसला आहे. आता ती बरा आहे. तिच्या डोक्याला फारसा त्रास झालेला नाही, कारण अभिनेत्रीने डोक्याजवळ उशी ठेवली होती.
अपघात झाला तेव्हा मलायका अरोरा तिच्या रेंज रोव्हर गाडीत होती. त्यांची कार दोन वाहनांमध्ये अडकल्याने हा अपघात झाला. वास्तविक, ती एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जात होती. मलायका अरोराच्या अपघाताची बातमी ऐकून चाहते नाराज झाले आहेत.
हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मलायकाचे सीटी स्कॅनही करण्यात आले होते, ज्यामध्ये तिचा रिपोर्ट एकदम ठीक आला आहे. मात्र, मलाइकाला रात्रभर रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून रविवारी सकाळी तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही खूप चांगले बाँड शेअर करतात. दोघांनीही मुलाखतींमध्ये डेटिंग केल्याची कबुली दिल्याने त्यांचे नाते चांगलेच चर्चेत आले आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे चाहते आता हे दोघे अखेर कधी लग्नबंधनात अडकतात याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. थेट टीव्ही