अरविंद केजरीवालांवर संतापली बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान, म्हणाली- निवडणूक जिंकण्याच्या लालसेने…

WhatsApp Group

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय चलन रुपयावर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची प्रतिमा लावण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. राजकारण्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळेच त्यांच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत.

आता गौहर खानने या प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. गौहर म्हणाली की, ते नेते कमकुवत आहेत जे पुढे जाण्यासाठी धर्माचा वापर करतात.

अभिनेत्री गौहर खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता ट्विट केले आणि लिहिले की, ज्या नेत्याला विकास हे आपले मुख्य ध्येय वाटत होते, तो राजकारणात जिंकण्याच्या शर्यतीचा बळी ठरला आहे. जे राजकारणी दुर्बल आहेत तेच पुढे जाण्यासाठी धर्माचा वापर करतात. केवळ निवडणूक जिंकण्याची हावच तुम्हाला एवढी वेगळी बनवू शकते, हे फार खेदजनक आहे.