
आलिया भट्ट, सोनम कपूर, बिपाशा बसू आणि देबिना बॅनर्जीनंतर आता अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. होय! गौहर खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. 39 वर्षीय गौहर खान प्रेग्नंट आहे आणि हे सांगण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गौहर खान आणि जैद दरबारच्या आनंदासाठी चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गौहरचे चाहतेही खूप आनंदी आहेत आणि तिच्या आणि तिच्या होणाऱ्या मुलाच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
Coronavirus In India: चीनमधील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर!
गौहर खानची सुंदर पोस्ट
20 डिसेंबरच्या संध्याकाळी गौहर खानने इंस्टाग्रामवर एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये झैद दरबार आणि गौहरचे दोन अॅनिमेटेड वर्जन कॅरेक्टर बाईकवर जाताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही ज्या बाईकवर स्वार होताना दिसत आहेत, तिला वेगळी सीट जोडलेली दाखवण्यात आली आहे. जे सूचित करते की तिसरी व्यक्ती देखील त्यांच्या प्रवासात सामील होणार आहे. त्या सीटवर टेडी बेअर बसला आहे.
View this post on Instagram
2 वर्षांपूर्वी झाले लग्न
गौहर खानचा नवरा जैद दरबार प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबारचा मुलगा आहे. गौहर खान आणि जैद दरबार 25 डिसेंबर 2020 रोजी विवाहबद्ध झाले. जैद हा गौहर खानपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी गौहरला वयाच्या अंतरामुळे खूप ट्रोल करण्यात आले होते. जैद त्याच्या पत्नीपेक्षा 12 वर्षांनी लहान असल्याचेही बोलले जात होते. यावर प्रतिक्रिया देताना गौहर म्हणाली होती की, जैदचे वय गुगलवर चुकीचे दाखवले जात आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण