
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma kapoor) आजही तिच्या सुंदरतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. येत्या काही दिवसांत, अभिनेत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. अभिनेत्री तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते, दरम्यान, अभिनेत्रीने असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून तुम्ही देखील फोटोवरून नजर हटवू शकणार नाही.
शेअर केलेल्या फोटोमध्ये करिश्मा कपूर पूलमध्ये दिसत आहे. हा फोटो मालदीवचा असल्याचं दिसतं आहे. या फोटोमध्ये करिश्मा कपूर काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने चेहरा दाखवलेला नाही. अभिनेत्रीचा चेहरा दिसत नसला तरी अभिनेत्री आपली फिगर फ्लॉंट करताना दिसली.
View this post on Instagram
करिश्माने हा फोटो अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोसह कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, ‘डे ड्रीमिंग.’ या फोटोवर सेलेब्स सातत्याने कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. अमृता अरोराने कॅप्शनमध्ये फायर ईमोजी शेअर केला आहे. तर दुसरीकडे, महीप कपूरने कॅप्शनमध्ये फायर इमोजीसह हार्ट ईमोजी शेअर केला आहे.